कर्तव्य

एका व्हायरसमुळे ते पूर्ण महानगर बंद आहे.
घरे बंद, आॕफिसेस बंद..
माॕल, चित्रपटगृहे, बागा, शाळा, काॕलेज सारे सारे बंद.
लोकल, मेट्रो, बसेस..सारी प्रवास साधनेही बंद.
संपूर्ण शहर लाॕकडाउन मधे आहे..

हाॕस्पिटल्स सुरू आहेत फक्त..
व्हायरसग्रस्त पेशंट येताहेत..उपचार घेताहेत..
एक पंधरवडा राहून बरे होउन परत घरी जाताहेत..
आज या व्हायरस उद्रेकाला चार महिने झालेत..

त्या शहरातलेच एक मोठे हाॕस्पीटल..
सर्वात वरचा दहावा मजला..
इथे एक वेगळा विभाग आहे..
सामान्य लोकांपासून अलग..अपरिचीत..

इथे एक विलीगीकरण कक्ष आहे..
या कक्षाले सारे पेशंटच वेगळे आहेत..
ते एकमेकांना तपासतात..
एकमेकांचे रिपोर्ट पहातात..
गरज पडली तर उपचारही करतात..
एकमेकांना प्रोत्साहन देतात..
पंधरा दिवस असे संपतात..

विलीगीकरण कक्षातले ते सारे पेशंट असतात..
डाॕक्टर्स, नर्सेस, वाॕर्डबाॕयज, सफाई कर्मचारी..

सगळे आपापले कोरोना नेगेटीव्ह प्रमाणपत्र घेतात..
एकमेकांना पाहतात..हसतात..

त्यातला सिनीअर डाॕक्टर मग ओरडून विचारतात
‘How is the Josh?’
‘High Sir..!!’ सगळेजण हसत उत्तर देतात.
‘I repeat..How is the Josh?’ ते पुन्हा विचारतात.
अजून जोरात सारे ओरडतात..
‘High Sir..!!’

आणि मग ते Quarantine केलेले चाळीस जण..
हाती घेतात आप आपल्या जबाबदा-या
हाॕस्पीटलच्या त्या नउ मजल्यांचा…

आणि दहाव्या मजल्यावरच्या ‘त्या’ कक्षात..
‘विलग’ होतात नवे चाळीस जण..
ज्यांनी हेच कर्तव्य पार पाडलेय..
या आधीचे पंधरा दिवस…

© सुनील गोबुरे

About Sunil Gobure 13 Articles
I am a Banking Professional, working currently with ICICI Bank Ltd. Basically an Engineer by education, I entered into Banking field in middle of my career. Since 2006 I am working with ICICI Bank. Currently posted at Sangli, taking care of Kolhapur Region as Regional Sales Manager for Business Loans Group.
2 Comment threads
0 Thread replies
0 Followers
 
Most reacted comment
Hottest comment thread
  Subscribe  
newest oldest most voted
Notify of
अजित

अतिशय समर्पक….

ninadpradhan

Superb… अप्रतिम